Maratha Kranti Morcha : औरंगाबादजवळ वाळूज परिसरात हवेत गोळीबार

राजेभाऊ मोगल 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान सुरु झालेल्या आंदोलनाने शेवटच्या टप्यात वाळूज औद्योगिक परिसरात हिंसक वळण घेतले. आदोलकांनी पोलिसांच्या वाहनासह एक ट्रक पेटवून दिला. औद्योगिक परिसरातील तब्बल 20 हून अधिक कंपन्यांची तोडफोड करण्यात आली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सहा गोळ्या हवेत फायर केल्या. आंदोलक आणि पोलिस आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी (ता.9) केलेल्या बंदला दुपारनंतर हिंसक वळण लागले. 

दिवसभर शांततेच्या मार्गाने सुरु असेलेल्या या आंदोलनाने पेट घेतला. शांतपणे रास्तारोको होत असताना अचानक पोलिस आणि आंदोलकांमध्ये वादाला तोंड फुटले. यानंतर पोलिसांचे एक वाहने तर एक ट्रक पेटवून देण्यात आला. संतप्त आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सहा गोळ्या हवेत झाडल्या. या प्रकारामुळे परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.

Web Title: Maratha Kranti Morcha : Firing in the air in Aurangabad