Maratha Kranti Morcha : पंचायत समितीचे गोदाम पेटवले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सेनगाव : येथे संतप्‍त आंदोलकांनी गुरुवारी (ता.9) दुपारी चार वाजता पंचायत समितीचा गोदाम पेटवून दिला असून यामध्ये लाखो रुपयांचे साहित्‍य जळाले आहे. बाजूच्‍या शेतातील शेतकऱ्यांकडून पाणी घेवून आगीवर ओतले जात आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाला सेनगाव तालुक्‍यात हिंसक वळण लागले आहे. आज पहाटे तीन वाजता तोष्णीवाल महाविद्यालयात मिनी स्‍कूलबस पेटवून देण्यात आली होती. त्‍यानंतर दुपारच्‍या सुमारास आंदोलकांनी सुरुची ढाब्‍याच्‍या बाजूला असलेली जीप पेटवून दिली. यामध्ये जीप जळून खाक झाली आहे. त्‍यानंतर दुपारी चार वाजता पंचायत समितीचा गोदाम पेटवून देण्यात आला. या गोदामामध्ये पुस्‍तके व इतर साहित्‍य जळत आहे. आग विझवण्यासाठी गोदामाच्‍या बाजूला असलेल्‍या एका शेतातून पाणी घेण्यात आले आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही.

Web Title: Maratha Kranti Morcha : Panchayat Samitee godown To burn