परभणी - चक्काजाम आंदोलनादरम्यान पोलिसांवर तुफान दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

परभणी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात गुरुवारी झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी जिल्हाभरात सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी (ता.28) चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान, असोला (ता.परभणी) येथे चक्काजाम आंदोलनादरम्यान जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या मुळे वातावरण अधिकच चिघळले आहे.

परभणी शहरात गुरुवारी मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. परंतू त्याचवेळी शहरात तुफान दगडफेकीच्या घटना घडल्याने पोलिसांना जमावाला शांत करण्यासाठी सोम्य लाठीहल्ला करावा लागला होता. यावेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत तीन पोलिस कर्मचारी व आंदोलणातील काही युवक जबर जखमी झाले होते. त्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (ता.29) जिल्हाभरात चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याप्रमाणे परभणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. परभणी शहरातील वसमतरस्ता व पाथरी रस्त्यावरील विसावा फाटा येथे सकाळी नऊ वाजल्यापासून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

पूर्णेत सकाळपासूनच सर्व शैक्षणिक संस्था व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. या तालुक्यातील गौर, माटेगाव आदी ठिकाणी चक्काजाम करण्यात आला.. मानवत शहर बंदचीहाक देण्यात आली. या ठिकाणी देखील सकाळपासूनच आंदोलन सुरु करण्यात आले. आहे. धानोरा काळे (ता.पूर्णा) येथे गोदावरी नदीवरील डिग्रस बंधाऱ्यात आंदोलनकर्त्यांनी उड्या घेतल्याने पोलिसांची दमछाक झाली. पोलिसांनी या ठिकाणी बचाव पथके तैनात केली. जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे जिंतूर - औरंगाबाद महामार्गावर रस्तारोको सुरु कऱण्यात आले. ताडकळस भागात अनेक रस्त्यावर मोठ -मोठी झाडे तोडून आडवी टाकण्यात आली. त्यामुळे रस्ते बंद झाले.

Web Title: maratha kranti morcha stone pelting on police in parbhani