मराठा क्रांती मोर्चा : ...तर सरकारविरोधी भूमिका घेणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मार्च 2019

बैठकीत समोर आलेल्या सूचना 
- प्रसंगी पुढाऱ्यांना गावबंदी करावी 
- अपक्ष मराठा उमेदवारास ताकद द्या 
- फितुरांपासून दूर राहा 

औरंगाबाद -  "एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र द्यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात; अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने आज दिला. 

भाजप-शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याने आता पुढे काय, याबाबत चर्चा करून रणनीती ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आज राज्यव्यापी बैठक घेतली. या वेळी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या समन्वयकांनी सूचना मांडल्या. मोर्चा समन्वयकांनी सांगितले की, मागील अडीच वर्षांत मराठा समाजाने ऐतिहासिक मोर्चे काढले. मात्र, सरकारने 21 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाबाबत तर घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांविरोधात प्रचार करावा लागेल. 

बैठकीत समोर आलेल्या सूचना 
- प्रसंगी पुढाऱ्यांना गावबंदी करावी 
- अपक्ष मराठा उमेदवारास ताकद द्या 
- फितुरांपासून दूर राहा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti morcha To take the role of anti-government