Maratha Reservation : निर्णय होईपर्यंत माघार नाही - मनोज जरांगे पाटील

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा गुलाल अंगावर घेतला आहे. त्याचा अपमान होऊ देऊ नका.
Eknath Shinde and Manoj Jarange Patil
Eknath Shinde and Manoj Jarange Patil esakal

वडीगोद्री (जि. जालना) - ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा गुलाल अंगावर घेतला आहे. त्याचा अपमान होऊ देऊ नका. सरकारने अधिसूचना, मसुदा, ‘सगेसोयरे’ आदी निर्णयांची १५ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी करावी अन्यथा बेमुदत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी सोमवारी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे दिला.

जरांगे यांनी गेल्या शनिवारपासून (ता.१०) उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस होता. अन्न, पाणी व वैद्यकीय उपचारांना त्यांनी नकार दिला आहे. अशक्तपणामुळे त्यांना उठता-बसता येत नाही. तरही ते उपोषणावर ठाम आहेत.

निर्णयांची अंमलबजावणी

करावी या मागणीसाठी बुधवारी ( ता.१४) महाराष्ट्र ‘बंद’ची हाकही समाजाने दिली आहे. ‘‘मी समाजाच्या पुढे जाणार नाही. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी समाजाने शांततेत करावी, अशी आपली इच्छा आहे,’ असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com