Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsakal

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकारमध्ये श्रेयवादासाठी धडपड; मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम

मराठा समाज हा आरक्षण करीता सत्तर वर्षापासून लढत आहे समाजाच्या एकोपा मुळे या आरक्षण लढ्याला मोठे यश मिळाले आहे.

- दिलीप दखणे

वडीगोद्री : मराठा समाज हा आरक्षण करीता सत्तर वर्षापासून लढत आहे समाजाच्या एकोपा मुळे या आरक्षण लढ्याला मोठे यश मिळाले आहे. राजपत्रित अध्यादेशाचा अधिवेशनात ठराव पास करूण कायदा करा व त्याची अंमलबजावणी करा यासाठी राज्यातील आमदार, मंत्री, यांनी अधिवेशनात पाठपुरावा करूण कायदा पास करावा, असे मनोज जरांगे यांनी सोमवार ता. 5 रोजी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

राजपत्रित अध्यादेशाची अंमलबजावणी , सगे सोयरे या साठी कायदा करावा करीता शनिवार ता.10 रोजी अंतरवाली सराटी येथे समाज बांधवाची बैठक होऊन त्या नंतर आपण उपोषणाला बसणार आहे या ठिकाणी राज्यातील अभ्यासु बांधवानी ,वकील यांनी उपस्थित राहून सुचना असतील तर सांगावे असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

आरक्षण करीता समाज एकत्र आला, राज्य मागासवर्ग आयोगाचे काम सुरू आहे, माझे कार्यकर्ते व समाजात ट्रप लावला गेला, दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, काही जन सुपारी घेऊन बोलत आहे, समाज त्यांचे ऐकणार नाही. मी डाॅक्टर असतो तर त्याचा मेंदू तपासला असता असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे.

सोशल मीडियावर काही जण माझ्यावर टीका करत आहेत, राज्यात काही जण वेगळं आंदोलन करत आहे. मात्र, हे सगळं श्रेयासाठी असून त्याचा आमच्या समाजाशी काहीही संबंध नाही. असं सांगत मनोज जरांगे यांनी वेगळं आंदोलन करण्याचा डाव रचानाऱ्यांची इशारा दिला. लवकर मी आंदोलनाला विरोधात बोलणार्यांची, ट्रप करणारे जे कोणी आहे त्यांचे नावं जाहीर करणार असल्याचं जरांगे म्हणाले. न्हावी समाजाला विनंती आहे की, जर तो तुम्हाला सगळ्यांना नोकऱ्या देत असेल तर आमच्या दाढ्या करू नका, पण त्यांनी नोकऱ्या दिल्या नाही तर जाब विचारा, अशी भुजबळांवर जोरदार टीका केली. शासनाकडुन संपर्क झाला नाही.

राज्यात 54 लाख नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्र वाटप होत आहे, शिंदे समिती कडून नोंदी शोधणे सुरु आहे, समीतीला मुदतवाढ मिळाली आहे, भट, देवस्थान, मंदिर, गॅजेट आदी ठिकाणी नोंदी शोधून त्या नोंदी आधारे कुणबी जात प्रमाणपत्र मिळत आहे, अधिवेशन मध्ये सगे सोयरे बाबत कायदा पास होणार आहे, गुन्हे वापस घेण्याची प्रक्रिया सुरु आहे, शासनाने आरक्षण बाबत मसुदा, अध्यादेश, दिला हे आरक्षणाचे यश नाही का? या साठी मुंबईला यावे लागले असा प्रश्न आरक्षणासाठी विरोध करण्यांना या वेळी मनोज जरांगे यांनी केला.

जरांगे यांचा दौरा

आरक्षण बाबत संवाद करण्यासाठी मनोज जरांगे हे मंगळवार ता. 6 रोजी अंतरवाली सराटी येथुन शिक्रापूर, चाकण, आळंदी येथे येत आहे, बुधवार ता. 7 रोजी आळंदी ते मुंबई , गुरूवार ता.8 रोजी नवि मुंबई ते दादर, शुक्रवार ता. 9 रोजी नाशिक, कोळगाव, मांजरसुंबा मार्ग अंतरवाली सराटी येथे येणार आहे. शनिवार अंतरवाली सराटी येथे बैठक व उपोषण असा जरांगे यांचा दौरा राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com