धक्कादायक घटना! पती-पत्नी मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झाले अन् घरी जाताच...

Maratha reservation movement-
Maratha reservation movement-
Updated on

जातेगाव (जि. बीड): मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील १५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहे. या आंदोलकांवर १ सप्टेंबरला लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला होता. राज्यभर मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आले आहे.

आरक्षणासाठी उपोषण असताना उठून गेलेल्या एकाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पती आणि पत्नीने दोघांनी आत्महत्या केली आहे.

Maratha reservation movement-
Jitendra Awhad : यांची औकात आहे का शरद पवार यांना वफाई साबीत करा हे सांगण्याची

नेमकं काय घडलं?

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी येथील ग्रामपंचायतीसमोर लाक्षणीक उपोषण सुरू होते. उपोषणस्थळावरून उठून गेलेल्या एकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्याच्या पत्नीचा घरी मृतदेह आढळल्याची घटना मंगळवारी दुपारी निदर्शनास आली. दोघांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

राजू बंडू चव्हाण (वय ३३) व सोनाली राजू चव्हाण (३०, रा जातेगाव) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने लाक्षणीय उपोषणास सुरू होते. त्यात राजू चव्हाण हेदेखील सहभागी होते.

सहभागी झालेल्यांपैकी काहींची भाषणे सुरू असतानाच राजू चव्हाण हे आंदोलनातून उठून गेले. काही वेळातच राजू चव्हाण व त्यांची पत्नी सोनाली यांनी आत्महत्या केल्याची माहिती उपोषणस्थळी धडकली. पाहणी केली असता राजू चव्हाण गळफास घेतलेल्या अवस्थेत तर सोनालीचा घरी मृतदेह आढळला. (latest marathi news)

Maratha reservation movement-
Maratha Andolan : मोठी अपडेट! मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन उदय सामंत विशेष विमानाने जालन्याकडे रवाना

तलवाडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे, फौजदार स्वप्नील कोळी, बीट जमादार नारायण काकडे, महेश झिकरे यांनी दोन्ही मृतदेह जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. दरम्यान, वैद्यकीय अहवालानंतरच दोघांच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट होईल, असे शंकर वाघमोडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com