Jitendra Awhad : यांची औकात आहे का शरद पवार यांना वफाई साबीत करा हे सांगण्याची

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा मंगळवारी अंबरनाथ येथे संवाद दौरा होता.
Jitendra Awhad
Jitendra Awhadsakal

डोंबिवली - राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा मंगळवारी अंबरनाथ येथे संवाद दौरा होता. या दौऱ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आव्हाड यांनी कोल्हापूर येथे पार पडलेल्या सभेविषयी सांगताना आव्हाड यांनी अप्रत्यक्षरीत्या धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. मुंडे यांनी केलेल्या शेरोशायरी वरून त्यांना लक्ष करत यांची औकात आहे का शरद पवार यांना वफाई साबीत करा हे सांगण्याची असे म्हणाले.

आव्हाड म्हणाले, कोल्हापूर येथील जाहीर सभेत एक शायरी म्हणण्यात आली...

मेरी कोई खता तो साबीत कर

बुरे है तो बरा साबीत कर

तुझे चाहा है कितना तू क्या जाने

चल हम बेवाफा ही सही

तू अपनी वफा तो साबीत कर

इथे साहेबांना आव्हान केले आहे की तुम्ही वफादार आहात हे साबीत करा. हे म्हणजे मला माहित नाही यांना शायरी किती समजते, काय समजते. पण या शायरीतून अर्थ काय निघतो की शरद पवार तुम्ही वफाई साबीत करा.

मी बेवफा आहे पण तुम्ही तुमची वफाई साबीत करा. यांची औकात आहे का शरद पवार यांना वफाई साबीत करा हे सांगण्याची. हातवारे करून शायरी म्हणायला खूप मज्जा येते, पण याचा अर्थ काय शरद पवार यांना वफाई साबीत करण्यासाठी अख्खा महाराष्ट्र पडला आहे.

तुमची लायकी पण नाही तुमच्यासमोर वफाई साबीत करण्याची गणेशोत्सव जवळ आला असून कोकणवासीयांना कोकणात जाण्याचे वेध लागले आहेत. त्यातच मुंबई गोवा महामार्गावरील टनेल मधील रस्त्याचे काम पूर्ण झाले असून तो मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला आहे. या मार्गाची एक लेन पूर्ण होऊन कोकनवासीयांचा प्रवास सुखकर होईल असा दावा केला जात आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी सुरक्षित जाईल का नाही घरी याची चिंता गणपतीला लागली आहे. हात मोडलेला पाय मोडलेला गणपती घरी गेला नाही म्हणजे मिळवलं...

अजितदादा गटातील 41 आमदारांवर शरद पवार गटाकडून नोटीसा देण्यात आल्या.

41 जणांना नोटिसा दिलेले आहेत. 24 नाही 41 आणि पाच विधान परिषद 25 की 46 जणांना नोटिसा Ncp चा शिष्टपालन समितीने देण्यात आलेल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या सरकार कोसळल्यानंतर आम्ही महायुतीमध्ये सहभाग होण्याचं पत्र अजित पवार यांनी दिलं होतं यावर जितेंद्र आवड यांची प्रतिक्रिया

असं पत्र दिलं होतं त्याच्यावर माझी सही सुद्धा होती मात्र ते पत्र साहेबांपर्यंत पोहोचलं की नाही हे मात्र अजूनही गुपितच आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com