Maratha Reservation : हे तर 'ओबीसी'च्या विरोधात षडयंत्र! ओबीसी बांधवांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

मराठा आरक्षणासंदर्भातील जानेवारी २०२४ अधिसूचनेचा मसूदा रद्द करण्यात यावा, यासाठी तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
obc society agitation
obc society agitationsakal

उमरगा (जि. धाराशिव) - मराठा आरक्षणासंदर्भातील जानेवारी २०२४ अधिसूचनेचा मसूदा रद्द करण्यात यावा, राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमुर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी तसेच चुकीच्या कार्यपध्दतीने मराठा - कुणबी किंवा कुणबी - मराठा प्रमाणपत्रांचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी आणि राज्यातील गोरगरीब ओबीसी, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे. या प्रमुख मागणीसाठी ओबीसी आरक्षण बचाव समितीच्यावतीने गुरुवारी (ता. एक) तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

हुतात्मा स्मारकापासुन निघालेल्या मोर्चात ओबीसीतील सर्व घटक बहुसंख्येने सहभागी झाले होते. धनगर समाजाच्या ढोल ताशांचा गजर, पारंपारिक वेशभुषेतील मसनजोगी समाज आणि पोचाम्मा समाजाचे बांधव पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते.

एकच पर्व ओबीसी सर्व... आमची जात ओबीसी, आमचा पक्ष ओबीसी... या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. श्री. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रियंवदा म्हादडळकर, नायब तहसीलदार रतन काजळे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बोलताना ओबीसीच्या नेत्या डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी ओबीसीवर अन्यायाचे षडयंत्र रचणाऱ्या राज्य सरकारवर प्रहार केला. मंडल आयोगाला आव्हान देण्याची कुटनिती अवलंबली जात असल्याचे सांगुन सरकारमधील मराठा मंत्री, आमदार व खासदार ओबीसीवर होणाऱ्या अन्यायाबाबत बोलत नाही.

अशा छुप्या राजकारण्यांना घरची वाट दाखवण्यासाठी ओबीसी बांधवांनी एकसंघ व्हावे. अँड. दिलीप सगर यांनी ओबीसी समाज बांधवाच्या ताटात माती कालवण्याचे काम सरकार करत आहे, यात सहभागी असलेल्या राजकिय, बिगर राजकिय लोकांची राखरांगोळी करण्यासाठी ओबीसींनी वज्रमुठ आवळावी असे आवाहन केले.

यावेळी अनिल उर्फ पप्पु सगर, सचिन पाटील, धनराज हिरमुखे, शिवलिंग माळी, परमेश्वर टोपगे, राजेंद्र पटवारी, संतोष कलशेट्टी, विनोद पतंगे, धनराज गिरी, डॉ. विक्रम जिवनगे, गावडे बुवा, देवीदास पावशेरे, रफिक तांबोळी, योगेश राठोड, पिंटु काळे, अजमभाई लदाफ, शंतनू सगर, शंकर विभुते, तानाजी दंडगुले, अनिल काळदाते, गोविंद घोडके, सुभाष चौधरी, बालाजी पांचाळ, विजया सोनकाटे, वर्षा व्हनाळे आदींची उपस्थिती होती.

तब्बल ३४ वर्षांनी ओबीसी रस्त्यावर!

मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी साधारणतः १९८८-१९८९मध्ये उमरग्यात माजी खासदार (कै.) बापूसाहेब काळदाते, काँ. राम बाहेती यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉं. अरूण रेणके, काँ. (कै.) विठ्ठल सगर, डॉ. दामोदर पतंगे, प्रा. (कै.) दत्तात्रेय पटवारी, अँड. दिलीप सगर आदींच्या पुढाकाराने ओबीसींच्या भव्य मेळावा घेण्यात आला होता.

मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी माजी नगराध्यक्ष पोपटराव सोनकांबळे, काँ. रेणके यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर तब्बल ३४ वर्षाने गुरुवारी हक्काचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com