Maratha Reservation : आंदोलकांकडून ट्रकचालक, प्रवाशांना अन्नदान

आपुलकीचा पाहुणचार ः बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांनाही दिले जेवण
maratha reservation protest donate food to truck drivers passengers marathi news
maratha reservation protest donate food to truck drivers passengers marathi newsSakal

भोकरदन : राज्यात मराठा समाज आरक्षणाचा प्रश्नावरून आक्रमक होताना दिसत आहे. मात्र भोकरदन तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आंदोलन कायम ठेवत सोमवार व मंगळवारी परराज्यातील ट्रकचालकांना व गैरसोय झालेल्या प्रवाशांना एक अनोख्या माणुसकीचे दर्शन दिले.

जालना-जळगाव महामार्गावर डावरगाव फाटा येथे सोमवारी सकाळपासून चक्काजाम आंदोलन सुरू आहे. या चक्काजामध्ये अडकलेल्या ट्रकचालक व इतर प्रवाशांची वालसा, खालसा, डावरगाव, बेलोरा या गावातील आंदोलनकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था करून आंदोलन सुरू असतानाही माणुसकीचे दर्शन घडवले.

ज्या ठिकाणी चक्काजाम करण्यात आला तेथे आसपास कुठलेही हॉटेल तसेच इतर सुविधा नसल्यामुळे ट्रक ड्रायव्हर व प्रवाशांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेत मराठा बांधवांनी सोमवारी आणि मंगळवारी प्रवाशांच्या स्वयंपाकाची व्यवस्था केली.

जालना-जळगाव रस्त्यावर चक्क लग्नाच्या वऱ्हाडाप्रमाणे जेवणाच्या पंगती सुरू केल्या. चारही गावांतील युवक व मराठा बांधवांनी सर्व साहित्य आणून प्रत्येक प्रवाशांना जेवण दिले. दोन दिवसांत जवळपास एक हजार नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. चक्काजामुळे त्रस्त झालेल्या परराज्यातील ट्रकचालकांना हा अनोखा सुखद धक्काच होता. दरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना देखील भोजन देण्यात आले.

संपूर्ण देशात आमचा वर्षभर प्रवास सुरू असतो. चक्काजाम, बंद, रास्ता रोको, ट्रकची तोडफोड आम्ही अनेकदा अनुभवतो. मात्र आंदोलनकर्त्यांनीच आग्रहाने भोजन दिले व आम्हाला कुठलाही त्रास न देता आपुलकीने पाहुणचार केला हे पहिल्यांदाच अनुभवत आहे.

- काका चौधरी, ट्रकचालक, जम्मू-काश्मीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com