-संतोष निकम
कन्नड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation Protest) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे मुंबई येथील आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला कन्नड तालुक्यातील औराळा सर्कलमधील सर्व गावातील मराठा बांधवांनी औराळा फाट्यावरून सोमवारी (ता. १) ला सकाळी भगवी उपरणे, शाली फिरवून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.