
Protester Injured in Train Fall Returning from Mumbai Dies During Treatment
Esakal
पंजाब नवघरे
हिंगोली ता.४( बातमीदार ) वसमत तालुक्यातील बोराळा येथील मराठा आरक्षण आंदोलक गोपीनाथ सोनाजी जाधव वय ४८ वर्ष यांचा मुंबईत उपचार दरम्यान मृत्यू झाला. मुंबई परत येताना सानपाडा येथे रेल्वेत पडून ते जखमी झाले होते. गोपीनाथ जाधव हे अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सक्रीय होते. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनात, मोर्चात त्यांनी सहभाग नोंदवला होता. गावातील तरुणांना एकत्र करत ते सातत्याने आरक्षण प्रश्नावरील आंदोलनात सहभागी होते.