मराठा आरक्षणासाठी शिवबा संघटना आक्रमक, गोलापांगरी येथे केला रास्ता रोको

बाबासाहेब गोंटे 
Saturday, 3 October 2020

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोलापांगरी येथे शनिवारी (ता.३) बसस्थानक परिसरात शिवबा संघटनेच्या वतीने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे. यासह आदी मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अंबड (जि.जालना) : अंबड जालना महामार्गावरील गोलापांगरी येथे शनिवारी (ता.३) बसस्थानक परिसरात शिवबा संघटनेच्या वतीने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे. यासह आदी मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन्यादरम्यान युवा कार्यकर्त्यांनी तसेच महिलांनी भगवे झेंडे हाती घेऊन एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी संपुर्ण परिसर निनादून गेला. 

यांचा होता सहभाग 
या आंदोलनात शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जराड, ज्ञानेश्वर बाबा देव्हडे (प्रदेश कार्याध्यक्ष) गणेश पाटील शिंदे (प्रदेशाध्यक्ष), दिव्या पाटील (प्रदेशअध्यक्ष युवती), रामजी गोल्डे (जिल्हाअध्यक्ष), प्रताप राखुंडे, श्रीराम कुरणकर, सोळुंके, भागवत सोळुंके, लक्ष्मण कदम, माधवी घोडके, गजानन महाराज देठे, गणेश देव्हडे, निवृत्ती देव्हडे, पांडुरंग देवडे, निवृत्ती देव्हडे, कृष्ण देव्हडे, वाल्मीक देव्हडे, दिनेश बागल, भरत बागल, सचिन बागल, सिद्धेश्वर देव्हडे, मुकुंद ढवळे, विठ्ठल बागल, बाळासाहेब देव्हडे, बंडू देव्हडे, शरद देव्हडे, गणेश देव्हडे, विनोद बागल, शिवाजी बागल, परमेश्वर बागल, गणेश बागल, सारंग ढवळे, रामेश्वर बागल, गोपाल बागल यांचा सहभाग होता. 

गिरी यांनी स्विकारले निवेदन 
याप्रसंगी महिला, युवती यांनी या रस्ता रोको आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी जालना तालुका तहसिल कार्यालयाचे महसूल विभागाचे गिरी यांनी निवेदन स्विकारले. परिसरात सर्व सकल मराठा समाजाचे नागरिक महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha reservation shivba sanghtna rasta roko