Maratha Reservation : विनायकराव पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी घेणार जीवंत समाधी!

विनायकराव पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी घेणार जीवंत समाधी!
lively Samadhi for maratha reservation
lively Samadhi for maratha reservationsakal

उमरगा (जि. धाराशिव) - महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अद्यापही सकारात्मक भूमिका घेतली नसल्यामुळे समाजसेवक विनायकराव पाटील यांनी शुक्रवारी (ता. तीन) कवठा येथे जीवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतल्याने समाधी अंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवली सराटी येथे गेल्या नऊ दिवसापासून सुरु असलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी समाजसेवक विनायकराव पाटील यांनी कवठा येथे अमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. तीन नोव्हेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर जीवंत समाधी घेणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत दिली होती.

शासन मराठा आरक्षणाने मराठा आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे व मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेदिवस खालावत चालल्यामुळे जीवंत समाधी घेण्याच्या निर्धारावर विनायकराव पाटील ठाम आहेत, उपोषण स्थळा पासून मैदानात ५ x ८ आकाराचा खड्डा जेसीबीच्या सह्याने खोदण्यात आला आहे. समाधी अंदोलनासाठी परिसरातील २५ गावातील भजनी मंडळ, दिंड्या जीवंत समाधी अंदोलनात सहभागी होणार आहेत.

कवठा बनले मराठा आरक्षणाचे केंद्र

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विनायकराव पाटील यांनी कवठा येथे २८ ऑक्टोबर पासून कवठा येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. कवठा ग्रामस्थानी चूल बंद व सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मराठा आरक्षणाच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. संपूर्ण कवठा गावातील ग्रामस्थ व परिसरातील हजारो मराठा समाजबांधव या उपोषणात सहभागी झाले आहेत.

मुख्याध्यापक राहूल सोनवणे यांच्यासह आदि ग्रामस्थांनी सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट देऊन कवठा गावच्या अंदोलनाची एकूणच माहिती देऊन विनायकराव पाटील व मनोज जरांगे यांच्यात संवाद घडवून आणल्याने अंतरली सराटी प्रमाणेच कवठ्याच्या मराठा आरक्षणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com