Maratha Reservation Survey : साठ हजार कुटुंबांचे उमरगा तालुक्यात सर्वेक्षण पूर्ण ; खुल्या प्रवर्गातील २३,९४१ कुटुंबे

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाची मोहिम राबवण्यात आली.
Maratha Reservation Survey
Maratha Reservation Surveysakal

उमरगा : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाची मोहिम राबवण्यात आली. यात प्रत्येक कुटुंबाच्या सर्वेक्षण करण्याच्या सूचना असल्याने प्रशासनाची यंत्रणा सर्वच जातीच्या कुटुंबापर्यंत पोहचली. यात ५९ हजार ९३८ कुटुंबांच्या सर्वेक्षणात मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंब संख्या २३ हजार ९४१ आढळून आली आहे.

मराठा समाज बांधवाची इंत्यभूत माहिती प्रत्यक्षात प्राप्त होण्यासाठी राज्य सरकारने ४ जानेवारीला सर्वेक्षणाचा निर्णय घेतला होता. राज्य मागासवर्ग आयोगाने यासाठी आवश्यक ती शासकिय यंत्रणा तयार ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार गोविंद येरमे यांनी  मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी प्रश्नावलीच्या अनुषंगाने मनुष्यबळाची तयारी केली. २३ जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती.

Maratha Reservation Survey
Maratha Reservation Survey : सर्वेक्षणाची मोहीम फत्ते; अहवाल शासनाला सादर ; जिल्ह्यातील चित्र,अनेक ठिकाणी नागरिकांची घरे आढळली बंद

२२ पथक, २२१ मतदार यादी भागासाठी असून एका ४४२ प्रगणक व २२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रश्नावलीतील माहिती हॅन्डहेल्ड डिव्हाईसद्वारे बहुपर्यायी स्वरुपात प्रगणकांनी भरावयाची असल्याने ही कामे सहशिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, पोलिस पाटील, कोतवाल, बीट अंमलदार, स्वस्तधान्य दुकानदार या कर्मचाऱ्यांनी पूर्ण भरून केली.

आरक्षण असलेली ३५,९९७ कुटुंबीय

२०११ च्या जनगणनेनुसार शहरी व ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या २ लाख ६९ हजार ५१९ आहे. आता ही लोकसंख्या ३ लाखाचा टप्पा ओलांडलेली असावी. प्रगणकांनी ५९ हजार ९३८ कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यात आरक्षण असलेली कुटुंब संख्या ३५ हजार ९९७ आढळून आली आहे. तर मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंब संख्या २३ हजार ९४१ आढळून आली आहे. यात मराठा समाजाची नेमकी कुटुंब संख्या आणि आरक्षणापासून दूर असलेले कुटुंब याबाबतची स्पष्ट माहिती वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या ऑनलाईन तपासणीत आढळून येईल.

शहरी व ग्रामीण भागातील मराठा समाज व खुला प्रवर्गातील नागरीकांचे प्रश्नावलीनुसार  सर्वेक्षणाचे कामकाज पूर्ण झाले आहे. विविध जातीचे आरक्षण असलेल्या कुटुंबांची संख्या वेगळी आहे. सर्वेक्षणाची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे.

- गोविंद येरमे, तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com