
नांदेड, ता. १ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र होत असून, महिलाही यात आघाडीवर आहेत. अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील मराठा समाजातील महिलांनी यंदा महालक्ष्मी सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी महिलांनी हा भूमिकात्मक निर्णय घेतल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.