Maratha Reservation : लढाई शांततेत करून जिंकायची - मनोज जरांगे पाटील

‘शांततेच्या आंदोलनातूनच मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आणले आहे. यामुळे आरक्षणाचा लढा शांततेत करायचा आहे.
Manoj jarange Patil
Manoj jarange Patilsakal

मुरूड (जि. लातूर) - ‘शांततेच्या आंदोलनातूनच मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आणले आहे. यामुळे आरक्षणाचा लढा शांततेत करायचा आहे. मी सांगतो म्हणून सहन करा. सत्तर वर्षानंतर मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळत आहे. या संधीचे सोने मराठ्यांनी करावे. आपल्याला आरक्षणाची लढाई शांततेत करायची आणि जिंकायचीही आहे. जीव गेला तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही’, असा निर्धार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे सोमवारी (ता.११) केला.

येथील विराट सभेत ते समाजबांधवांसमोर जाहीर सभेत सोमवारी (ता.११) बोलत होते. जरांगे म्हणाले, की काबाडकष्ट करून लेकरांना शिकवायचे आणि आरक्षण नसल्यामुळे लेकरांना उच्चशिक्षण मिळाले नाही किंवा नोकरी मिळाली नाही. यामुळे समाजात मोठ्या संख्येने बेरोजगारी वाढली. अनेकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. या आरक्षणानेच मराठ्यांच्या पोरांचा घात केला. आरक्षण असताना दुसऱ्यांनी खाल्ले. जाणूनबुजून लेकरांना आरक्षण दिले नाही. आज ३५ लाख कुणबी नोंदी सापडल्या.

तीन महिन्यात ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले. याच नोंदीचा आधार घेऊन महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी सरकारला डेडलाईन दिली आहे. या मुदतीत आरक्षण न दिल्यास लढाईला सज्ज रहा. विजय फक्त मराठ्यांचा होणार आहे, याची खात्री देतो. शांततेची भाषा करू. शांततेत आंदोलन करू. उद्रेक, जाळपोळ नको. जातीयवाद व तेढ नको. २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे, यात शंका नाही. तरीही गावोगाव पिंजून काढा. घराघरातील मराठा जागा करा.

तर जशास तसे उत्तर देऊ - जरांगे

आमचे आंदोलन शांततेत सुरू असताना काहीजणांची भूमिका उद्रेक, कोयता, कुऱ्हाडी व जातीयतेची आहे. त्यांचा उद्देश जातीयवाद व तेढ निर्माण करायचा असून आपल्याला उचकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही शांततेचे आवाहन करत असताना त्यांच्याकडून मात्र, तसे आवाहन केले जात नाही. यामुळे आमचाही नाईलाज होईल व जशास तसे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी भुजबळ यांचे नाव न घेता दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com