मराठा आरक्षणासाठी ७ नोव्हेंबरला मातोश्रीवर मशाल मोर्चा! 

प्रकाश बनकर
Wednesday, 4 November 2020

मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : मराठा आरक्षणावर घालण्यात आलेली स्थगिती हटविण्यासाठी राज्यसरकार काहीच प्रयत्न करीत नाही. त्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यसरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने, शनिवारी (ता.7) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान तथा शिवसेना भवन 'मातोश्री' समोर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी पत्रकारपरिषदेत दिली.   

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मराठा आरक्षण लांबवू पाहणारे महाविकास आघाडीचे ओबीसी मंत्री आता मराठा-ओबिसी वाद पेटवून आपली लिडरशिप सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजातील तरूणांचे शैक्षणिक व नोकर भरती या संदर्भात राज्य सरकार जोपर्यंत भुमिका स्पष्ट करत नाही. सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठवण्यासाठी हालचाल करत नाही. तोपर्यंत राज्यात प्रवेश प्रक्रिया आणी नोकर भरती राबवू दिली जाणार नाही. राज्याच्या गृहमत्र्यांनी पोलीस भरती करू आशी घोषणा केली असली तरी मराठा समाजाला बाजूला ठेऊन पोलीस भरती केल्यास मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पोलीस भरतीला राज्यभर विरोध केला जाईल. पुढील होणाऱ्या परिणामास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल, असेही मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील म्हणाले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, राज्यभरातील मराठा समन्वयक, मराठा संघटना प्रमुख, मराठा सेवक सहभागी होणार आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मंत्र्यांना बाहेर पडू देणार नाही

मराठा समाजाने एवढे मोर्चे काढूनही सरकार जर मराठा समाजाच्या पदरी निराशाच पाडायला तयार असतील तर येणाऱ्या काळात मराठा क्रांती ठोक मोर्चा जोपर्यंत मंत्री मराठा आरक्षणावर बोलणार नाहीत. तोपर्यंत एकाही मंत्र्यांना आपल्या बंगल्या बाहेर पडू देणार नाही, असा इशाराही मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला. 
यावेळी किरण काळे पाटील, मनोज मुरदारे पाटील, राहुल पाटील, सचिन मिसाळ, लक्ष्मण नवले, विक्रम पवार, भरत कदम, पंढरीनाथ गोडसे यांच्यासह आदी समन्वयक व पदाधिकारी उपस्थित होते. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha reservation for MASHAL march on Matoshri November seven