गरजू कुटुंबांच्या मदतीला मराठा सेवा संघ

file photo
file photo
Updated on

परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या गरजू कुटुंबांच्या मदतीला येथील मराठा सेवा संघ धावून आला आहे. मागील २१ दिवसांपासून शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोफत जेवण दिले जात असून आता एक हजार लोकांना किराणा साहित्य व धान्य वाटपाचे काम सुरू केले आहे.
लॉकडाउन झाल्यापासून मराठा सेवा संघाने विविध उपक्रम हाती घेत गरजूंना मदत देणे सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात रक्तदान शिबिर घेत रक्त संकलनात मदत केली आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात विविध आजारांशी निगडित उपचार घेणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे लॉकडाउनमुळे जेवनाचे हाल सुरू झाले होते. त्यामुळे मराठा सेवा संघाने स्वयंसेवकांमार्फत अशा गरजू रुग्ण व नातेवाइकांचा शोध घेत तब्बल २०० लोकांच्या जेवणाची सोय केली आहे.

हेही वाचा व पहा - Video: भुकेल्यांसाठी शिवभोजनाची थाळी ठरतेय तारक


ता.२७ एप्रिलपासून हा उपक्रम सुरू केला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात शहराच्या विविध भागांत गरजू कुटुंबांचा शोध घेतला असून त्या एक हजार कुटुंबांना मदत दिली जात आहे. या टप्प्यात एक हजार कुटुंबांपर्यंत मदत दिली जाणार आहे. त्याची सुरवात मंगळवारी (ता. १४) शहरातील दर्गा रस्त्यावरील वसाहतीमध्ये करण्यात आली. या वेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

 पाच वाहनांची व्यवस्था
देण्यात येणाऱ्या किटमध्ये गहू, तांदूळ, साखर, गोडतेल आदी किराणा साहित्याचा समावेश आहे. त्यासाठी प्रशासनाकडून परवानगी घेतली आहे. तसेच पाच वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. किट वाटपाचे शहराच्या रचनेनुसार नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २००, तर दुसऱ्या दिवशी २०० किटचे वाटप झाले असून उर्वरित किट तीन दिवसांत वाटप होणार आहेत. वाटपासाठी सेवा संघाचे जिल्हा सचिव नवनाथ जाधव, विठ्ठल भुसारे, प्रा. दिलीप मोरे, सुभाष शिंदे, विशाल जावळे, बाळासाहेब यादव, कल्याण लोहट आदी पुढाकार घेत आहेत.


लवकरच ग्रामीण भागात मदत
लोकसहभागातून मराठा सेवा संघाने हे कार्य हाती घेतले आहे. गरजू कुटुंबांना किमान १५ दिवस पुरेल एवढी मदत केली जात आहे. लवकरच ग्रामीण भागातदेखील मदत केली जाणार आहे.
विद्याचरण कडवकर, जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com