Beed News : आष्टीत सकल मराठा समाजबांधव एकवटला ; ट्रॅक्टर रॅली काढून दिला सरकारला इशारा

रॅलीमध्ये २०० ट्रॅक्टरचालक व मराठाबांधवांनी सहभाग घेतला होता.
Beed
Beed sakal

आष्टी : मराठा आरक्षणाच्या संदर्भात आष्टी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने व शेतकरी बांधवांच्या वतीने आष्टी शहरांमध्ये शुक्रवारी (ता.११) महाट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये २०० ट्रॅक्टरचालक व मराठाबांधवांनी सहभाग घेतला होता. मुंबई येथे २० जानेवारी रोजी मराठा आरक्षणसंदर्भात विराट महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आष्टी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने व शेतकरी बांधवांच्या वतीने महाट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मराठा बांधवांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत सरकारला ‘मराठा आरक्षण देता की जाता’ असा इशारा दिला. २० जानेवारीपर्यंत आरक्षण न दिल्यास आष्टी तालुक्यातून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या बरोबर मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे आगे कूच करणार आहेत. त्यामुळे शासनाने याची दखल घेत मराठा आरक्षणासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा.

आष्टी येथील विराट ट्रॅक्टर रॅली नगर रोडवरील मोरे मंगल कार्यालय लिमटाका चौक या ठिकाणी सुरू होऊन बेलगाव रोड, अहिल्यादेवी होळकर चौक ते लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनी मंदिर, आष्टी कमान वेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक ते कमानवेस महात्मा जोतिबा फुले चौक, महावीर चौक, छत्रपती व्यापारी संकुल आष्टी या ठिकाणी सर्व ट्रॅक्टर रॅली थांबवून या ठिकाणी समारोप करण्यात आला.

ट्रॅक्टरसह धडकणार मुंबईत...

सरकारने मुंबईत ट्रॅक्टरला बंदी घातली असली तरी सरकारचा विरोध जुगारून आष्टीतील मराठा बांधवांनी आष्टीत ट्रॅक्टर रॅली काढत २० जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या मुंबई येथील विराट मोर्चासाठी सरकारकडून ट्रॅक्टर बंदी घालण्यात आली असली तरी आष्टी तालुक्यातून हजारो शेतकरी व मराठा युवक मुंबई येथे दाखल होणार असल्याचे सकल मराठा बांधवांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com