#MarathaKrantiMorcha गेवराई -  दोघांचा तहसिलवर कार्यालयावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

गेवराई (बीड) - बंद दरम्यान तहसिल कार्यालय बंद करण्यासाठी गेलेल्या दोघांनी तहसिल कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (ता. २४) दुपारी घडली. 

गेवराई (बीड) - बंद दरम्यान तहसिल कार्यालय बंद करण्यासाठी गेलेल्या दोघांनी तहसिल कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (ता. २४) दुपारी घडली. 

काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातही युवकांनी फेरी काढून बाजारपेठ बंद ठेवली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. यातील दोघे कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चढले. त्यांना खाली आणण्यासाठी पोलिस गेले असता वरुन उड्या मारण्याचा इशारा या दोघांनी दिला. यानंतर आंदोलक समन्वयकांनी वर चढून त्यांना खाली उतरविले. 

Web Title: MarathaKrantiMorcha Gevrai - two attempt suicide