#MarathaKrantiMorcha चाकूरमध्ये वेगवेगळी चार आंदोलने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

चाकूर - मराठा क्रांती ठिय्या आंदोलकांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता.२) एकाच दिवशी वेगवेगळी चार आंदोलने केली. यावेळी चाकूर तालुक्‍यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाकूर तहसीलसमोर मराठा क्रांती ठिय्या आंदोलकांचे मागील चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी तालुक्‍यातील समाजबांधव ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी आंदोलनस्थळी मुंडण करून शासनाचा निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर गोडजेवणाचा कार्यक्रम करण्यात आला. लातूर - नांदेड महामार्गावर गाड्यांची चाके जाळून चक्का जाम करण्यात आला. शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून तरुणांनी शोले स्टाईल आंदोलन केले.यावेळी पोलिसांनी रस्त्यावर जळत असलेली चाके पपन कांबळे, अनिल महालिंगे, पद्माकर कोर्ती यांच्या मदतीने  बाजूला काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. पोलिस उपनिरीक्षक अभंग माने, शैलेश बंकवाड, बाळू आरदवाड, दत्तात्रय चामे, तानाजी आरदवाड यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation