#MarathaKrantiMorcha शिंदे कुटुंबीयांना महापालिका करणार दहा लाखांची मदत

Kakasaheb Shinde
Kakasaheb Shinde

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या हुतात्मा काकासाहेब शिंदे या तरुणाच्या कुटुंबीयांना महापालिकेतर्फे दहा लाख रुपयांची मदत मंगळवारी (ता. २४) सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली. शिवसेना, काँग्रेस, एमआयएमतर्फे सरकार, प्रशासनाचा या वेळी करण्यात निषेध करण्यात आला, तर भाजपच्या माजी महापौरांनी मध्येच राजकारण आणल्याने सभागृह चांगलेच खवळले.

शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ म्हणाले, की सोमवारी घडलेल्या घटनेला मुख्यमंत्री व प्रशासन जबाबदार आहे. त्यांचा निषेध नोंदविण्यात यावा. राजू वैद्य यांनी शासन वेळोवेळी आश्‍वासन देत आहे; मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आता उद्रेक होत असल्याचे नमूद केले. काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिरंगाईमुळे ही घटना घडल्याचा आरोप केला. रामेश्‍वर भादवे यांनी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली. एमआयएमचे अयुब जागीरदार, अब्दुल नाईकवाडी, भाजपचे प्रमोद राठोड, राज वानखेडे, कीर्ती शिंदे, गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर महापौरांनी शिंदे कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली. कुटुंबाने होकार दिल्यानंतरच ही मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासाठी श्री. जंजाळ यांनी ठराव मांडला. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह स्मिता घोगरे, मनोज बल्लाळ यांनी ठरावाला अनुमोदन दिले.

यातही राजकारण
भाजपचे माजी महापौर भगवान घडमोडे म्हणाले, की मराठा समाजातील ७० घराण्यांनी आतापर्यंत सत्ता उपभोगली; मात्र ते न्याय देऊ शकले नाहीत. आता राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. त्यावर सभागृहात गोंधळ उडाला. शिवसेना-काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी माघार घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com