महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन

प्रल्हाद कांबळे 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मराठा आंदोलनाच्या मागील काही घटना लक्षात घेता व उद्या महाराष्ट्र बंदच्या दरम्यान जिल्ह्यात काही अनुचीत प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून पोलिस अधिक्षक संजय जाधव व अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्या आदेशावरून रुट मार्च काढण्यात आला.

नांदेड : मराठा आरक्षण संदर्भाने सकल मराठा समन्वय समितीच्या वतीने गुरूवारी (ता. 9) पुकारलेल्या बंदच्या काळात काही हिंसक आंदोलन किंवा कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही यासाठी पोलिसांनी बुधवारी (ता. 8) तरोडा नाका येथून पथसंचलन करून पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचा निर्वाळा दिला आहे. 

मराठा आंदोलनाच्या मागील काही घटना लक्षात घेता व उद्या महाराष्ट्र बंदच्या दरम्यान जिल्ह्यात काही अनुचीत प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून पोलिस अधिक्षक संजय जाधव व अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्या आदेशावरून रुट मार्च काढण्यात आला. रॅपीड ॲक्शन फोर्सचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुभाष चंदा, पोलिस निरीक्षक श्री. सुरेश यांच्या नेतृत्वाखाली दोन कंपन्या दोन दिवसांपासून शहरात दाखल झाल्या आहेत. त्यांनी शहराच्या व जिल्ह्यातील काही महत्वाच्या ठिकाणाची पहाणी केली. बुधवारी या पथकांनी लिंबगाव, अर्धापूर या संवेदनशिल भागात रुट मार्च केला. तसेच पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. के. डमाळे, महिला फौजदार अनिता चव्हाण, सविता खर्जूले, चित्तरंजन ढेमकेवाड यांच्यासह आदी कर्मचारी या पथसंलनात सहभागी झाले होते. हत्यारबंद रॅपीड ॲक्शन फोर्सचे जवान नांदेडकरांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांच्या अंगावरील बुलेट प्रुफ गणवेष हातात शस्त्र आणि हेल्मेट हे कुठल्याही संकटाचा सामना करण्यास तयार असल्याचे दिसून येत होते. हा रुटमार्च भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी 6 वाजता काढण्यात आला. यावेळी पोलिस अधिक्षक संजय जाधव आणि रॅपीड ॲक्शन फोर्सचे सुभाष चंदा यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचे सहकार्य करण्याचे आवाहन केले. कायदा हातात घ्याल तर भेट आमच्याशी असल्याचे श्री. चंदा यांनी सांगितले. जिल्ह्यात जवळपास चार हजारहून अधिक पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस अधिकारी आंदोलकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून राहणार आहे.  

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MarathaKrantiMorcha State Police Is Ready For Maharashtra Bandh