'मी देखील आरक्षणाच्या लढाईतील शिपाई'; मराठा तरुणाची आत्महत्या

Beed
Beed

बीड : मराठा आरक्षण मागणीचा जिल्ह्यात पहिला आणि राज्यातील सातवा बळी मंगळवारी (ता. ३१) गेला. अभिजित बालासाहेब देशमुख (वय ३५, रा. विडा, ता. केज) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

विज्ञानातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेला अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होता. त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांवर बँकेचे कर्जही थकीत होते. आरक्षण न दिल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बँकेचे कर्जही मिळत नसल्याचे तो मित्रांशी बोलत होता. दरम्यान, सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग घेतला. आरक्षण मागणीसाठी सहा बळी गेल्यानंतर "मी देखील या लढाईतील शिपाई असून बलिदान देणार" असल्याचे त्याने सोमवारी रात्रीही बोलून दाखविले होते असे डॉ. धनराज पवार यांनी सांगितले.

अभिजित देशमुख याने मंगळवारी सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधी खर्च या कारणाने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. केज पोलीस ठाण्याचे जमादार ढाकणे यांनी पंचनामा लेला असून त्यातही तसा उल्लेख आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com