नांदेडला 6 जानेवारीपासून  मराठी बालनाट्य संमेलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नांदेड - येथे येत्या सहा जानेवारीपासून दुसरे अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन होणार असून ते आठ जानेवारीपर्यंत चालेल. ज्येष्ठ रंगकर्मी कांचनताई सोनटक्के यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे. शहरातील विविध भागांत एकूण सहा रंगमंचांवर बालनाट्ये सादर होतील, अशी माहिती स्वागताध्यक्ष, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

नांदेड शहर परिसरातील सव्वा ते दीड लाख शालेय मुलांना या संमेलनात प्रेक्षक म्हणून सहभाग नोंदविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या संमेलनात बालउद्‌घाटकाची संकल्पना राबविण्यात येणार आहे. बालनाट्यांच्या सादरीकरणासह "पाहुणे येती घरा', "अंगत-पंगत', "डबापार्टी', "कथा-सरिता सागर', "जुलूस पथनाट्याचा', "नाटक आपल्या दारी', "आपल्यासाठी छोटा कट्टा' आदी उपक्रमांसह चर्चासत्रे, परिसंवाद आणि मुलाखती अशी संमेलनाची साधारणतः रूपरेषा असेल, असे चव्हाण म्हणाले. मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या, ज्येष्ठ रंगकर्मी कांचनताई सोनटक्के यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 

Web Title: marathi balnatya sammelan 6 jan in nanded