औरंगाबादेत प्रश्न कचरा पेटला; आंदोलकांनी कचऱ्याच्या 2 गाड्या पेटवल्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

औरंगाबाद : मिटमिटा येथे कचरा टाकण्यावरुन आंदोलन पेटले असुन औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोधानंतर पोलीसांनी लाठीमार करुन अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी जमावाने तुफान दगडफेक करत कचऱ्याच्या दोन गाड्या पेटवल्या. दगडफेकीत दोन गाड्यांचे नुकसान झाले असुन नऊ पोलीस जखमी झाले आहेत. 

मागील 20 दिवसांपासून औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्‍न आंदोलनामुळे गंभीर झालेला आहे. शहराच्या परिसरातील गावांमध्ये कचरा टाकण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला आहे. अनेक वेळा येथील आंदोलन हिंसक झाले आहे. आज बुधवारी मिटमिटा भागात कचरा टाकण्यासाठी गेलेल्या गाड्या अडवून त्या पेटवून देण्यात आला. जमाव मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी लाठीमार केला यानंतर तुफान दगडफेक झाली. येथील आग आटोक्‍यात आणण्यासाठी तीन अग्निशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर पोलीस उपायुक्त दीपाली धाटे घाडगे, विनायक ढाकणे हे परिस्थीतीवर नियंत्रण ठेऊन आहेत. सध्या पोलीस आक्रमक झाल्याने जमाव पांगवण्यात आला आहे. 

Web Title: marathi news aurangabad garbage issue protest