शहागंज येथे इंडिका जळून खाक 

योगेश पायघन
सोमवार, 12 मार्च 2018

कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे कार जळल्याची माहिती परिसरातील नागरीकांनी दिली.

औरंगाबाद - शहागंज परिसरातील मोहन टॉकीजच्या मागच्या बाजूस सोमवारी (ता. 12) इंडिका कार (एमएच 20 बीवाय 4096) जळून खाक झाली. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे कार जळल्याची माहिती परिसरातील नागरीकांनी दिली. या घटनेची सिटीचौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 6.25 च्या सुमारास परिसरातील नागरीकांनी अग्नीशमन विभागाला कार जळत असल्याची माहिती दिली. मात्र, अग्नीशमन बंब पोहोचेपर्यंत इंडिका कार (एमएच 20 बीवाय 4096) जळून खाक झाली होती. अग्नीशमन बंबाने आग आटोक्‍यात आणली. त्यात कारचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप कारण स्पष्टं होऊ शकले नाही. कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी कार उभी होती. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे कार जळल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: marathi news aurangabad indica car fire police

टॅग्स