‘ऑरिक’मध्ये बांधा बंगले!

बुधवार, 21 मार्च 2018

औरंगाबाद - ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीमध्ये राहू इच्छिणाऱ्यांना आता बंगलेही उभारता येणार आहेत. ‘बजेट होम’ची वसाहत तयार करण्याच्या प्रक्रियेसह औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाउनशिप (एआयटीएल)ने शेंद्रा येथे १६ रहिवासी भूखंड लिलावासाठी काढले आहेत.

औरंगाबाद - ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीमध्ये राहू इच्छिणाऱ्यांना आता बंगलेही उभारता येणार आहेत. ‘बजेट होम’ची वसाहत तयार करण्याच्या प्रक्रियेसह औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाउनशिप (एआयटीएल)ने शेंद्रा येथे १६ रहिवासी भूखंड लिलावासाठी काढले आहेत.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत शेंद्रा येथे वसविण्यात येत असलेल्या स्मार्ट औद्योगिक शहरामध्ये आतापर्यंत केवळ औद्योगिक वापरासाठीचे भूखंड लिलावासाठी काढले गेले; पण या वसाहतीत आता नागरी वसाहत वसवण्याकडे एआयटीएलने वाटचाल सुरू केली आहे. पंधरा एकर भागांत नागरी वसाहत उभी करण्यासाठी इच्छुक बांधकाम व्यावसायिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या प्रक्रियेच्या सोबतच ‘एआयटीएल’ने आता १६ बंगलो भूखंडही लिलावासाठी काढले आहेत. तीन ते पाच हजार चौरस फूट आकाराचे रहिवासी क्षेत्रातील सेक्‍टर १० मध्ये असलेल्या १६ भूखंडांचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे. ह्योसंगला देण्यात आलेल्या १०० एकराच्या भूखंडांच्या उत्तरेला ही बंगल्यांची वसाहत वसविण्याचा मानस एआयटीएलचा आहे, त्याअंतर्गत ही लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या रहिवासी, बंगल्यांसाठीच्या भूखंडांलगत असलेल्या प्रस्तावित रस्त्यांची कामे आता हाती घेण्यात आली आहेत. या भूखंडांलगत ड्रेनेज आणि अन्य भूमिगत लाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्याचे ऑरिक प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

अर्ज प्रक्रिया सहा एप्रिलपर्यंत सुरू राहणार
ऑरिकतर्फे मोक्‍याच्या जागेवरील दोन व्यावसायिक वापरासाठीचे भूखंड लिलावासाठी काढण्यात आले आहेत. सेक्‍टर १ मधील हे भूखंड असून, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून ऑरिकमध्ये जातानाच्या ६० मीटर रुंद रस्त्यावर ते आहेत. सेक्‍टर ५ मधील १२ व्यावसायिक भूखंडांचा लिलावही केला जाणार असून, ६ एप्रिलपर्यंत सर्व भूखंडांची अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. औद्योगिक भूखंडांचे क्षेत्रफळ हे ४००० चौरस मीटरपर्यंत राहील. 

Web Title: marathi news aurangabad news auric Bungalows