घोषणेच्या दीड वर्षांनंतर कर्करोग रुग्णालयाचे भूमीपूजन

योगेश पायघन
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

डॉ. तोगडिया विषयी बोलणे टाळले
शासकीय आरोग्य व्यवस्थेत पुरेसे डॉक्टर नाहीत, परिचारिका नाहीत. इमारत आहे तर यंत्रसामग्री नाही. यंत्र असेल तर ते चालू नाही. त्यामुळे देशाचे आरोग्य आयसीयूत आहे. आजारामुळे कुटुंब गरिबीकडे ढकलल्या जात असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या योजनां  विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी शनिवारी लक्ष केले होती. त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी जे. पी. नड्डा यांनी बोलण्याचे टाळले. तर या भाभाट्रॉनचे उदघाटन झाले असले तरी प्रत्यक्ष सेवा द्यायला आजून दोन महिने लागणार असल्याचे घाटी प्रशासनाने स्पष्ट केले

औरंगाबाद : देश पोलिओ मुक्त झाला आता टीबीमुक्त करण्यासाठी 2025 लक्ष आहे. कर्करोगासह मधुमेह, रक्तदाब यासारख्या आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेत केंद्र शासनाने उप आरोग्य केंद्र हे युनिव्हर्सल स्क्रिनिंगसाठी वेलनेस सेंटर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला राज्य शासनाने सहकार्य केल्यास वयाच्या तिसाव्या वर्षीच सर्वरोग निदान आणि उपचार शक्य होणार आहे. या माध्यमातून स्वस्त उपचार देत रोगाकडून निरोगाकडे जाण्याचा प्रयत्न केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा म्हणाले.

राज्य कर्करोग संस्थेचे भूमिपूजन आणि भाभा ट्रॉन-२ युनिटचे उद्घाटन रविवारी (ता.11) केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी.  नड्डा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन , महापौर नंदकुमार घोडेले, जि प अध्यक्ष देवयानी डोणगावकर, आमदार अतुल सावे, आमदार सुभाष झांबड, आमदार प्रशांत बंब, डॉ. भागवत कराड, शिरीष बोराळकर, टाटा चे शैक्षणिक संचालक डॉ. कैलास शर्मा, वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख, सहसंचालक प्रकाश वाकोडे, सहसंचालक सुरेश बारपांडे, उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता पाटील, डॉ भारत सोनवणे, विभागप्रमुख डॉ बालाजी शेवाळकर, डॉ मारोती पोटे, नारायण कानकाटे, राम बुधवंत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रश्मी बॅंगोली, डॉ वेणू अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. तर सिव्हिल हॉस्पिटल, एमयूएचएस चे कार्यालयाची जागा पुढच्या विस्तारीकरणासाठी मिळावी अशी मागणी करत वर्ल्ड बँकेच्या टीमचे आभार विशेष कार्य अधिकारी डॉ अरविंद गायकवाड यांनी मानले.

डॉ. तोगडिया विषयी बोलणे टाळले
शासकीय आरोग्य व्यवस्थेत पुरेसे डॉक्टर नाहीत, परिचारिका नाहीत. इमारत आहे तर यंत्रसामग्री नाही. यंत्र असेल तर ते चालू नाही. त्यामुळे देशाचे आरोग्य आयसीयूत आहे. आजारामुळे कुटुंब गरिबीकडे ढकलल्या जात असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या योजनां  विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी शनिवारी लक्ष केले होती. त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी जे. पी. नड्डा यांनी बोलण्याचे टाळले. तर या भाभाट्रॉनचे उदघाटन झाले असले तरी प्रत्यक्ष सेवा द्यायला आजून दोन महिने लागणार असल्याचे घाटी प्रशासनाने स्पष्ट केले.

Web Title: Marathi news Aurangabad news cancer hospital in Aurangabad