औरंगाबादेत कचऱ्याची आणीबाणी 

माधव इतबारे
गुरुवार, 1 मार्च 2018

मलई खाण्यासाठी सोबत, कचऱ्यात टोलवाटोलवी 
मलई खाण्यासाठीच शिवसेना-भाजपची युती असून, कचराकोंडी होताच दोन्ही पक्ष हा विषय एकमेकांकडे टोलवत आहेत. जनतेचे दोन्ही पक्षांना काहीच देणे-घेणे नाही, कचरा प्रकल्पातही कोट्यवधींची डील होईल, अशी टीका यावेळी करण्यात आली. 

औरंगाबाद - शहराच्या कचराकोंडीला गेल्या पंचवीस वर्षांपासून सत्ता भोगणारेच जबाबदार असून, आता आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी एमआयएमचे महापालिकेतील विरोधी पक्षनेचे फेरोज खान व गटनेते नासेर सिद्दीकी यांनी गुरुवारी (ता. एक) केली.

कचऱ्याच्या प्रश्‍नावर पत्रकारांसोबत बोलताना फेरोज खान म्हणाले, ""गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात हजारो टन कचरा पडून असून, त्यातून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे जुन्या शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे; मात्र अद्याप सत्ताधारी, प्रशासनाला तोडगा काढता आलेला नाही.

गेल्या पंचवीस वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत काहीच केले नाही. त्यामुळेच कचऱ्याची स्थिती गंभीर बनली आहे. आयुक्तही सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने महापालिका बरखास्त करण्यात यावी,'' अशी मागणी त्यांनी केली. श्री. सिद्दिकी यांनीदेखील सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतले.

आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या जमिनीमुळे नारेगावला विरोध 
नारेगाव परिसरात माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह महापालिकेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या जमिनी आहेत. झालर विकास आराखड्यामध्ये या जमिनींचे भाव वाढवून घेण्यासाठीच नारेगाव कचरा डेपोला विरोध केला जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. 

मलई खाण्यासाठी सोबत, कचऱ्यात टोलवाटोलवी 
मलई खाण्यासाठीच शिवसेना-भाजपची युती असून, कचराकोंडी होताच दोन्ही पक्ष हा विषय एकमेकांकडे टोलवत आहेत. जनतेचे दोन्ही पक्षांना काहीच देणे-घेणे नाही, कचरा प्रकल्पातही कोट्यवधींची डील होईल, अशी टीका यावेळी करण्यात आली. 

Web Title: marathi news aurangabad news corporation garbage mim