...तर कचरा प्रश्‍नी पोलिस बळाचा वापर करू ! 

राजेभाऊ मोगल
शनिवार, 3 मार्च 2018

त्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा 
साचलेल्या कचऱ्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मनपा हद्दीतील जागेवर नगरसेवक, त्यांचे नातेवाईक किंवा नागरिकांनी विरोध केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल; तसेच त्यांचे सभासदपदही रद्द केले जाईल, असा थेट इशाराच श्री. भापकर, श्री. मुगळीकर यांनी या वेळी दिला. 

औरंगाबाद - शहरातील कचरा प्रश्‍नावर सोळाव्या दिवशीही तोडगा काढू न शकलेल्या प्रशासनाने आता कठोर भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. नारेगाव कचरा डेपो वगळता महापालिका हद्दीत कचरा टाकण्यास कुणी विरोध केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, गरज पडल्यास पोलिस बळाचा वापर करावा लागेल, असा इशारा विभागीय अुायक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महापालिका आयुक्‍त दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (ता. तीन) दिला आहे. 

कचऱ्यामुळे घडलेल्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. तीन) विभागीय आयुक्तालयात यावर बैठक झाली. नारेगावला आंदोलकांचा विरोध कायम असल्याने शहरातील कचरा मनपाच्या जागेवार टाकावा, जर कोणी याला विरोध करीत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, तसेच गरज पडल्यास पोलिस बळाचा वापर करावा लागेल, असे श्री. भापकर व श्री. मुगळीकर यांनी स्पष्ट केले. 

शुक्रवारी (ता. दोन) कांचनवाडीतील मनपाच्या 24 एकर जागेवर कचरा टाकला. याला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनतर आडगाव, तीसगाव, वाळूज आदी ठिकाणी कचरा टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथील ग्रामस्थांनीही विरोध केल्याने कचरा टाकणे थांबविण्यात आले. 

त्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा 
साचलेल्या कचऱ्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मनपा हद्दीतील जागेवर नगरसेवक, त्यांचे नातेवाईक किंवा नागरिकांनी विरोध केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल; तसेच त्यांचे सभासदपदही रद्द केले जाईल, असा थेट इशाराच श्री. भापकर, श्री. मुगळीकर यांनी या वेळी दिला. 

Web Title: marathi news aurangabad news corporation garbage Problems bhapkar magalikar