निवृत्त स्टेनोसह मुलाविरुद्ध खंडणीचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

औरंगाबाद - पोलिस आयुक्तालयातून निवृत्त झालेले स्टेनो (लघुलेखक) व त्यांच्या मुलाविरुद्ध जमीनमालकाला पाच लाखांची खंडणी मागून वीस हजार रुपये घेतल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 19) गुन्ह्याची नोंद झाली. सिटी सर्व्हे विभागात दिलेला तक्रार अर्ज परत घेण्यासाठी त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप आहे. एस. एस. बारी व वसीम बारी अशी संशयितांची नावे आहेत. 

औरंगाबाद - पोलिस आयुक्तालयातून निवृत्त झालेले स्टेनो (लघुलेखक) व त्यांच्या मुलाविरुद्ध जमीनमालकाला पाच लाखांची खंडणी मागून वीस हजार रुपये घेतल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 19) गुन्ह्याची नोंद झाली. सिटी सर्व्हे विभागात दिलेला तक्रार अर्ज परत घेण्यासाठी त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप आहे. एस. एस. बारी व वसीम बारी अशी संशयितांची नावे आहेत. 

पोलिस तक्रारीनुसार, एस. एस. बारी पोलिस आयुक्तालयात स्टेनोपदावरून निवृत्त झाले आहेत. या प्रकरणात नासेरखान गणीखान यांनी तक्रार दिली. त्यांचे कटकटगेट येथील घर व जमीन मिळून तेरा गुंठ्यांचा महापालिका व सिटी सर्व्हे विभागासोबत वाद आहे. याबाबत त्यांनी महापालिका (कोट कॉर्पोरेशन) येथे दावा दाखल केला; मात्र जमिनीशी संबंध नसताना संशयित बारी यांनीही महापालिका, सिटी सर्व्हे विभागात अर्ज दाखल केला. याबाबत नासेरखान यांनी बारी यांच्याशी संपर्क साधला व अर्ज दाखल केल्याची बाब विचारली. त्यावेळी तक्रार अर्ज परत घेण्यासाठी तडजोड करा, असे त्यांना नासेरखान यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर नासेरखान यांना भेटण्यासाठी मध्यस्थामार्फत बोलावण्यात आले; पण नासेरखान यांनी जाणे टाळले. 17 फेब्रुवारीला एक व्यक्ती नासेरखान यांना भेटला व बारी यांच्याकडे जाऊन वाद मिटवून घेण्याचे सांगितले. त्यामुळे नासरेखान यांनी बारी यांची हर्सूल टी पॉइंट येथे एका हॉटेलमध्ये भेट घेतली. तेव्हा प्रकरण पोलिस आयुक्तांपर्यंत गेल्याचे बारी यांनी नासेरखान यांना सांगितले. विशेषत: पोलिस आयुक्त व एका पोलिस निरीक्षकांच्या नावाचा पैसे उकळण्यासाठी त्यांनी वापर केला. यानंतर पुन्हा त्या व्यक्तीने नासेरखान यांना फोन करून बारी यांनी बोलावल्याचा निरोप दिला. त्यामुळे नासेरखान, त्यांचा मित्र व मध्यस्थ व्यक्ती बारी यांच्या घराजवळ गेले. साठे चौकालगत बारी व त्यांचा मुलगा आला. नासेरखान यांनी तेथे त्यांना रोख वीस हजार रुपये दिले. त्यानंतर उर्वरित रक्कम तत्काळ द्यावी, असे बारीकडून धमकावण्यात आले. या प्रकरणात नासरेखान यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयितांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी दिली. 

अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर 
पोलिस आयुक्तालयातील निवृत्त स्टेनोचा संशयित आरोपीत समावेश आहे. तत्कालीन पोलिस आयुक्तांना तीन लाख, एका पोलिस निरीक्षकाला दोन लाख रुपये, स्वत:साठी एक प्लॉट व रक्कम द्यावी लागेल असे सांगत त्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: marathi news aurangabad news crime Ransom offense against child with retired steno