उच्च शिक्षण विकास आयोगावर सतीश चव्हाण यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगावर सदस्य म्हणून नियुक्ती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज जाहीर केली. मुख्यमंत्री या आयोगाचे अध्यक्ष आहेत. आयोगाच्या माध्यमातून विद्यापीठांशी विचारविनियम करून उच्च शिक्षणासाठी सुविधांचे समन्यायी वाटप सुनिश्‍चित करणे, शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करताना प्रशासन व नियमनातील राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील विकास जाणून त्याचा मागोवा घेणे, त्या बदलानुरूप राज्यातील शिक्षणपद्धतीमध्ये यथोचित धोरण व कार्यतंत्र विकसित करणे, शैक्षणिक व इतर पायाभूत सुविधांच्या सहभागासाठी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य व परस्पर संपर्काचा आढावा घेत साधने सुचविणे आदी त्यांची कार्य व कर्तव्ये राहतील.
Web Title: marathi news aurangabad news high education development commission satish chavan