बुवा, बाबांना राज्यमंत्री करता,  मग आम्हाला कलेक्‍टर तरी करा! 

राजेभाऊ मोगल
बुधवार, 11 एप्रिल 2018

औरंगाबाद - अभियांत्रिकी, विधी यासह अन्य पदव्या घेऊनही आम्हाला नोकऱ्या दिल्या जात नाहीत. दुसरीकडे बुवा, बाबांना थेट राज्यमंत्री केले जात आहे. मग आता आम्हालाही कलेक्‍टर तरी करा, अशी मागणी करीत मानव हित सामाजिक अभियानतर्फे मंगळवारी (ता.दहा) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आता शिक्षण सोडून बुवा, बाबा व्हावं वाटतंय, अशी इच्छाही व्यक्‍त केली. 

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराज, बाबांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. यावर तरुणांनी सोशल मीडियावर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. तसेच येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होम हवन करीत, बुवा, बाबांचे कपडे परिधान करीत सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी धरणे आंदोलन केले.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले, की अपार कष्ट सहन करीत शिक्षण घेत स्पर्धा परीक्षा देत आहोत. पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करूनही आम्हाला नोकरी मिळत नाही. दुसरीकडे फारसे शिक्षण न घेणाऱ्या बुवा, बाबांना थेट राज्यमंत्री करता. मग आम्हाला देखील राज्यमंत्री नाही करता आले, तर किमान कलेक्‍टर तरी करा.

अण्णा भाऊ साठे यांच्या सून सावित्रीबाई साठे, नातू सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनात भाऊराव प्रभाळे, अनिल सरोदे, पांडरंग गायकवाड, किरण शिरसाठ, प्रवीण भारस्कर, कृष्णा काथे, शुभम इंगळे, रितेश कांबळे, शरजित अन्सारी, राजेंद्र वाघमारे, सचिन गवारे, कबीर भालेराव, शेरजील अन्सारी, राजेंद्र वाघमारे, नागेश गवई यांचा सहभाग होता.

Web Title: marathi news aurangabad news make him a minister of state, then do us collector!