औरंगाबादच्या ‘जिंगल टून्स’चा  आशियात आवाज

संदीप लांडगे 
रविवार, 11 मार्च 2018

औरंगाबाद - ॲनिमेशन्स क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत शहरातील ‘जिंगल टून्स’ या यू-ट्युब चॅनेलने अवघ्या दीड वर्षात आशियातील पहिल्या पन्नास कंटेंट प्रोड्युसरमध्ये स्थान पटकाविले. त्यामुळे यू-ट्युबकडून या चॅनेलचा गोल्डन बटन अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. 

औरंगाबाद - ॲनिमेशन्स क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत शहरातील ‘जिंगल टून्स’ या यू-ट्युब चॅनेलने अवघ्या दीड वर्षात आशियातील पहिल्या पन्नास कंटेंट प्रोड्युसरमध्ये स्थान पटकाविले. त्यामुळे यू-ट्युबकडून या चॅनेलचा गोल्डन बटन अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. 

संदीप पाठक यांनी वर्ष २०१६ मध्ये यू-ट्युबवर ‘जिंगल टून्स’ चॅनेल सुरू केले. सुरवातीला अवघ्या सहा महिन्यांतच एक लाख सबस्क्राइबर, तीन कोटी व्ह्यूज मिळाले. त्यामुळे यू-ट्युब आशिया पॅसिपिकचे संचालक डेव्हिड पॉवेल यांच्या हस्ते सिंगापूरमध्ये ‘सिल्वर प्ले बटन अवॉर्ड’ मिळाला. त्यानंतर आठ महिन्यांतच या चॅनेलला दहा लाख सबस्क्रिप्शन्स आणि १०० कोटी व्ह्यूज मिळाल्याने मे २०१७ मध्ये यू-ट्युबच्या कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील मुख्य कार्यालयाकडून पाठक यांना ‘गोल्डन प्ले बटन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. 

भारतीय संस्कृतीची ओळख
आजच्या तरुण पिढीला व परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या मुलांना भारतीय संस्कृती, राजा-महाराजांची, स्वातंत्र्यसेनानींची ओळख व्हावी, यासाठी आठ भाषांमध्ये शौर्यकथा यू-ट्युबवर रिलीज करण्याचे काम कंपनीकडून सुरू आहे. 

तंत्रज्ञान आत्मसात करून मिळविले यश 
पाठक हे पंधरा वर्षांपासून सीडी तयार करण्याच्या व्यवसायात आहेत; मात्र विज्ञान युगातील स्पर्धेत टिकायचे असेल, तर टेक्‍नॉलॉजी तंत्र आत्मसात करावे लागेल. हेच उद्दिष्ट ठेवत त्यांनी यूृ-ट्युब चॅनल सुरू केले. भारतीय संस्कृती, मूल्ये जपत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲनिमेशन दिल्यामुळे हे चॅनेल सर्वांच्या पसंतीस उतरले आहे. 

नऊ भाषांतून काम
या चॅनेलवर पारंपरिक बालगीते, कथा यांचे ॲनिमेटेड व्हिडिओ टाकले जातात. मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती भाषांसह इंग्रजी, अरबी, स्पॅनिश अशा नऊ भाषांमधून हे चॅनेल चालविले जात आहे.

Web Title: marathi news aurangabad news sandeep pathak