प्रसिद्ध गायिका आशालता करलगीकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आशालता यांना त्यांच्या मधुर आवाजामुळे ‘आंध्रलता’ ही पदवी बहाल केली होती. 

औरंगाबाद : प्रसिद्ध गायिका आशालता करलगीकर (वय 75) यांचे शुक्रवारी (ता. 30) मध्यरात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आशालता यांना त्यांच्या मधुर आवाजामुळे ‘आंध्रलता’ ही पदवी बहाल केली होती. 

मुळच्या कर्नाटकातील विजापूरच्या असलेल्या आशाताई लग्नानंतर औरंगाबाद इथे स्थायिक झाल्या होत्या. मराठवाड्याचे नामवंत गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्यासोबत आशाताईंचे देशभरात गझल गायनाचे कार्यक्रम लोकप्रिय झाले. त्यांनी अनेक तेलगु चित्रपटांमध्ये पार्श्वगायनही केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासमोर गाणे सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी गायलेले कबिराचे भजन ऐकून माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे डोळे पाणावले होते, असे जाणकार सांगतात.

Web Title: Marathi news Aurangabad news singer Ashalata Karalgikar passed away