अपुऱ्या शैक्षणिक सुविधांच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 20 जुलै 2018

औरंगाबाद -  अपुऱ्या शैक्षणिक सुविधा मिळत असल्याच्या विरोधात औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील डॉक्‍टर ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता.20) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी घोषणाबाजी करीत त्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

औरंगाबाद -  अपुऱ्या शैक्षणिक सुविधा मिळत असल्याच्या विरोधात औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील डॉक्‍टर ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता.20) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी घोषणाबाजी करीत त्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान या मोर्चात आपल्या मागण्याबाबतच्या बॅनर, पोस्टर्सने सर्वाने लक्ष वेधून घेतले होते. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले, की फार्म.डी. या अभ्यासक्रमाला शिक्षण घेत असताना आम्हाला अपुऱ्या शैक्षणिक सुविधा मिळत आहेत. यामुळे आमचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

एकावर्षापासून आम्ही शासनाकडे पत्रव्यवहार करीत आहोत. मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. तसेच मागील महिन्यात तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. तरीही मागण्यांवर ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे आता तरी आम्हाला न्याय मिळेल, या आशेनी मोर्चा काढत आहोत. 2014 -15 पासून बंद केलेली शिष्यवृत्ती सुरु करावी,

शासकीय रुग्णालयामध्ये फार्म. डी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, पदवीपूर्व सेवा करताना पदव्युत्तर शिक्षणाप्रमाणे मानधन सुरु करावे, महाविद्यालयामध्ये डॉक्‍टर ऑफ फार्मसीसाठी फार्म. डी. शिक्षण घेतलेले अनुभवी शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, यासह अन्य मागण्या केल्या आहेत.

या आंदोलनात रामप्रसाद नागरे, अमित गोटफोडे, राजेश घोडके, धिरज भोंबे, अंकेश पवार, वेदांती रासवे, श्रद्धा सीनकर, किशोरी पस्ते यांच्यासह विद्याथ्यांचा मोठा सहभाग होता.

Web Title: Marathi news Aurangabad news Students' agitation against insufficient educational facilities.