जलयुक्त कामांचे होणार ‘जिओ टॅगिंग’

Jalyukta Shivar
Jalyukta Shivar

बीड - राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगसगिरी झाल्याचे उघडकीस आले आहे. अनेक ठिकाणी कागदोपत्री कामे केल्याचे, तर काही ठिकाणी निकृष्ट कामे करून बिले लाटल्याचे समोर आले आहे. हा प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलयुक्त अभियानातील कामांचे ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय घेतला असून हे काम प्रत्यक्षात सुरूही झाले आहे. यामुळे बोगसगिरीला चाप बसणार असून एका क्‍लिकवर आता कामाचे लोकेशन व छायाचित्र पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे राज्यात प्रथमच बीड जिल्ह्यात हा प्रयोग होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.

जिल्ह्यातील परळी तालुक्‍यात जलयुक्त कामातील गैरप्रकार समोर आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने गैरप्रकार रोखण्यासाठी या कामांचे ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. याअंतर्गत केलेल्या कामाची माहिती ऑनलाइन भरायची असून यानंतर या कामाचे छायाचित्र काढून त्याच्या अक्षांश-रेखांशाची माहिती प्रशासनाने विकसित केलेल्या मोबाईल ॲपमध्ये भरायची आहे. यासह या कामाचे जीपीएस लोकेशन घेऊन त्याची नोंद घेतली जाणार असून सॅटेलाइटद्वारे या कामाची माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे. यामुळे प्रत्यक्ष कामाला भेट दिली नाही तरी काम सदर ठिकाणी झाले आहे की नाही, हे तपासता येणार आहे.

प्रशासनाने शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेच्या कामातही ही पद्धत वापरली आहे. जिल्ह्यात साडेसहा हजार शेततळे उभारण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी तीन हजार २४४ शेततळी आतापर्यंत पूर्ण झाले असून ३०२ शेततळ्यांचे कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. पूर्ण शेततळ्यांपैकी २३७१ शेततळ्यांची सर्व माहिती ऑनलाइन भरण्यात आली असून २१३२ शेततळ्यांचे छायाचित्र अपलोड व जिओ टॅगिंगचे काम पूर्ण झाले आहे. बीएलओ नेटच्या कामात जिल्हा देशात अव्वल आल्यानंतर राज्यात जलयुक्त व शेततळ्यांच्या कामाचे ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा उपक्रम प्रथमच बीड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com