बीड जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्षा संपली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

बीड - सात वर्षानंतर जिल्हा परिषदेला आयएएस दर्जाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाल्याने गतिमान प्रशासनाच्या बीडकरांच्या अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी पुर्ण केल्या. बुधवारी (ता. 7) पदभार घेताच त्यांनी शिरुर कासार आणि पाटोदा पंचायत समित्यांना भेटी दिल्या. गैरहजर आढळलेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल देण्याचे निर्देश श्री. येडगे यांनी दिले. शुक्रवारी (ता. 2) राज्यातील 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नवीन पदस्थापनेचे आदेश निर्गमित झाले. यामध्ये अमोल येडगे यांची बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली. 

नाशिक येथे सहाय्यक जिल्हाधिकारी असलेले श्री. येडगे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून असलेली पहिलीच नेमणूक आणि बीड जिल्हा परिषदेला सात वर्षांनंतर मिळालेले आयएएस दर्जाचे अधिकारी त्यामुळे सामान्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ग्रामीण विकासाचा पाया असलेल्या जिल्हा परिषदेचे प्रशासनाचे नियोजन ढिसाळ झाले असून अनेक विभाग आणि कामांत अनियमितता घडलेल्या आहेत. मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईतून वचक आणि प्रशासन गतीमान करण्यात पुर्वीच्या अधिकाऱ्यांना अपयश आले होते. त्यामुळे श्री. येडगे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. अमोल येडगेंनीही धडाक्यात एंट्री करुन आपल्या कामाची चुणूक दाखविली. बुधवारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांच्याकडून पदभार स्विकारताच त्यांनी शिरुर व पाटोदा पंचायत समितींना भेटी दिल्या. सीईओंच्या पहिल्याच दौऱ्यात शिरुरमध्ये नऊ कर्मचारी गैरहजर आढळून आले. या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश अमोल येडगे यांनी दिले. यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांच्या भेटी घेतल्या. 
 
Web Title: marathi news beed municipal corporation chief executive officer