बीड: नारायण क्षीरसागर यांच्यासह दोघांचा अपघाती मृत्यू

सुधीर एकबोटे
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पाटोदा (बीड) : तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असुन जवळाला फाटा जवळ झालेल्या अपघातात माजी जि. प. सदस्य नारायण क्षीरसागर यांच्यासह एकाचा मृत्यु झाला, तर दूसऱ्या घटनेत चुंभळी फाट्याजवळ दुचाकीच्या अपघातात आष्टी येथील युवक जागीच ठार झाला. बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पाटोदा येथील रहिवासी नारायण मारोती क्षीरसागर (वय 65) आणि त्यांच्यासमवेत असलेले कैलास  उत्तमराव जाधव (रा. सुतार गल्ली, पाटोदा, वय 32) यांचा आज मध्यरात्री १२.३० ते १.०० च्या सुमारास बीड ते पाटोदा प्रवासात जौळाला शंभरचिरा  दरम्यान रस्त्यावर इंडीका गाड़ी क्र. (एम. एच. ४८ एफ.

पाटोदा (बीड) : तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असुन जवळाला फाटा जवळ झालेल्या अपघातात माजी जि. प. सदस्य नारायण क्षीरसागर यांच्यासह एकाचा मृत्यु झाला, तर दूसऱ्या घटनेत चुंभळी फाट्याजवळ दुचाकीच्या अपघातात आष्टी येथील युवक जागीच ठार झाला. बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पाटोदा येथील रहिवासी नारायण मारोती क्षीरसागर (वय 65) आणि त्यांच्यासमवेत असलेले कैलास  उत्तमराव जाधव (रा. सुतार गल्ली, पाटोदा, वय 32) यांचा आज मध्यरात्री १२.३० ते १.०० च्या सुमारास बीड ते पाटोदा प्रवासात जौळाला शंभरचिरा  दरम्यान रस्त्यावर इंडीका गाड़ी क्र. (एम. एच. ४८ एफ. १००९) झाडावर धडकुन झालेल्या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही गाड़ी स्वतः नारायण क्षीरसागर हेच चालवत होते. अपघात झाल्यानंतर काही वेळाने पाटोदा पोलीसांची गाडी त्या ठिकाणी फेरीसाठी गेली असता त्या ठिकाणी त्यांनी हा अपघात झाल्याचे बघितले व त्यानंतर पोलीसांनी त्यांना गाड़ीतुन बाहेर काढून पाटोदा ग्रामीण रूग्णालयात आणले. त्यानंतर गंभीर अवस्थेमुळे त्यांना बीड येथे हलविण्यात आले मात्र तोपर्यत त्यांचा मृत्यु झाला होता. 

चुंभळी फाट्यावरील अपघातात आष्टीचा युवक ठार 
पाटोदा तालुक्यातील चुंभळी फाटा परीसरात बुधवारी रात्री दूचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सतिश मछिंद्र टेकाडे (वय २८) (रा. आष्टी) हा युवक जागीच ठार झाला आहे.

 

Web Title: Marathi news beed news accident narayan kshirsagar

टॅग्स