बीड: वांजरा फाटा परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

सुधीर एकबोटे
बुधवार, 10 जानेवारी 2018

पाटोदा तालुक्यातील वांजरा फाटा परिसरात दिलीप संभाजी घुले यांच्या शेतातील घरावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चार दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून त्यांना औताच्या लोखंडी पाईप ने जबर मारहाण केली व अंगावरील सोन्याचे दागिने रोख रक्कम व तीन मोबाईल घेऊन पोबारा केला

पाटोदा : तालुक्यातील वांजरा फाटा परिसरात मंगळवारी(ता.९) मध्यरात्री दरोडेखोरां नी धुमाकूळ घालून येथील घुले कुटुंबियांवर हल्ला केला. सोन्याच्या दागिन्यांसाह रोख रक्कम असा ऐवज लंपास करून तेथून पळ काढला. य दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत घुले दाम्पत्यासह त्यांची मुलगीही गंभीर जखमी झाली. तपासा साठी दरोडा प्रतिबंधक पथकासह श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलेले आहे. मात्र आद्यपही  दरोडेखोरांचा कोणताही तपास लागलेला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की पाटोदा तालुक्यातील वांजरा फाटा परिसरात दिलीप संभाजी घुले यांच्या शेतातील घरावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चार दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून त्यांना औताच्या लोखंडी पाईप ने जबर मारहाण केली व अंगावरील सोन्याचे दागिने रोख रक्कम व तीन मोबाईल घेऊन पोबारा केला. दरम्यान या घटने मध्ये दिलीप संभाजी घुले, सखुबाई दिलीप घुले व शुभांगी दिलीप घुले हे तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या उपचारासाठी जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून या अज्ञात दरोडे खोरांचा तपास सुरू आहे

Web Title: Marathi news Beed news decoit