गोदाकाठच्या गावांना गारपीटीने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

रामपिंपळगांव शिवारातील एक शेतकऱ्याची 1200 पपईचे झाडे असलेली बाग पुर्णतः उध्वस्त झाली आहे. त् नुकसान झालेल्या भागाची पाहणी कृषी खात्याने देखिल केली आहे.

माजलगांव, जि. बीड  : अवकाळी वादळी वारे व गारपीटीचा तडाखा तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या गावांना गारपीटीचा मोठा फटका बसला असुन आंबा व पपईच्या बागा उध्वस्त झाल्या असुन गहु, हरभरा, ज्वारी, उस पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. 

आज ता. 11 रविवारी सकाळी सात वाजता झालेल्या अवकाळी वादळी वारे व गारपीट सुरू झाली. या गारपीटीचा फटका गोदाकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणावर बसला असुन हिवरा, काळेगांव, डुब्बाथडी, वारोळा, टाकरवण, सावरगांव, वाघोरा या गावातील पपई, आंब्याच्या बागा उध्वस्त झाल्या असुन गहु, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

रामपिंपळगांव शिवारातील एक शेतकऱ्याची 1200 पपईचे झाडे असलेली बाग पुर्णतः उध्वस्त झाली आहे. त् नुकसान झालेल्या भागाची पाहणी कृषी खात्याने देखिल केली आहे. तर प्रशासनाच्या वतीने देखिल नुकसानीचे पंचनामे नायब तहसिलदार एस. एस. रामदासी यांनी केले आहेत.

Web Title: Marathi news Beed news hailstorm in majalgaon