पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यासाठी दहा हजार कोटी आणले: पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेचे काम वेगात सुरु असून २०१९ पर्यंत याला मुर्त स्वरुप येईल. विकसासाठी आतापर्यंत जिल्ह्याला दहा हजार कोटी रुपये आणल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल यात्रा आणि विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत बोलताना मुंडे म्हणाल्या, ज्यांनी गायरान जमिनीवर संस्था उभारल्या, गरिबांचे संसार उध्वस्त केले त्यांना काय बोलतो याचा विचार करावा.

बीड : आतापर्यंत जिल्ह्याला २० पालकमंत्री झाले. सर्वाधिक १० हजार कोटी रुपयांचा विकास निधी आपण जिल्ह्यासाठी आणल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगीतले. 

जिल्हा नियोजन समितीची रविवारी (ता. २१) बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषदेत श्रीमती मुंडे बोलत होत्या. आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर. टी. देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर उपस्थित होते. ३१५ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजूरी दिली असून आणखी यात वाढ करुन ३४० कोटी रुपयांचा आराखडा शासनास सादर केला जाणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेचे काम वेगात सुरु असून २०१९ पर्यंत याला मुर्त स्वरुप येईल. विकसासाठी आतापर्यंत जिल्ह्याला दहा हजार कोटी रुपये आणल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल यात्रा आणि विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत बोलताना मुंडे म्हणाल्या, ज्यांनी गायरान जमिनीवर संस्था उभारल्या, गरिबांचे संसार उध्वस्त केले त्यांना काय बोलतो याचा विचार करावा. भाषण करताना आपण काय केले याचा विचार केला जात नाही. आपण हल्लाबोल केला तर खरंच बोलू असेही श्रीमती मुंडे म्हणाल्या. 

Web Title: Marathi news Beed news Pankaja Munde statement