बीड: ऊसाच्या पैशासाठी जय महेश कारखान्यावर शिवसेनेचे आंदोलन

कमलेश जाब्रस
शनिवार, 10 मार्च 2018

पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याने मागील तीन महिन्यांपासुन गाळप करण्यात आलेल्या उसाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील पवारवाडी येथील खासगी तत्वावरील असणाऱ्या जय महेश साखर कारखान्याने डिसेंबरपासून गाळप केलेल्या उसाचे ११० कोटी रूपये थकविले असुन उस बिलाची रक्कम तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवारी (ता. १०) धरणे आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याने मागील तीन महिन्यांपासुन गाळप करण्यात आलेल्या उसाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. जय कारखान्याने थकविलेली ११० कोटी रूपये रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावेत या मागणीसाठी कारखान्यावर शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आप्पासाहेब जाधव, विनायक मुळे, अशोक आळणे, नितीन मुंदडा, शिवमुर्ती कुंभार, दत्ता रांजवण यांचेसह शिवसैनिक सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन कारखाना उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना देण्यात आले तर आठ दिवसांत ऊस बिलाची रक्कम टप्याटप्याने देण्यात येईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.

Web Title: Marathi news Beed news Shivsena agitation