चेतन भगत देणार विद्यार्थ्यांना ‘ऊर्जा’ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

औरंगाबाद - पदवी पूर्ण करताना ‘एमपीएससी’ आणि ‘यूपीएससी’ या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रसिद्ध लेखक चेतन भगत, आयपीएस सोमय मुंडे आणि ‘रिलायबल’चे संस्थापक संचालक धनंजय अकात मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम रेडिओ आहे. 

औरंगाबाद - पदवी पूर्ण करताना ‘एमपीएससी’ आणि ‘यूपीएससी’ या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रसिद्ध लेखक चेतन भगत, आयपीएस सोमय मुंडे आणि ‘रिलायबल’चे संस्थापक संचालक धनंजय अकात मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम रेडिओ आहे. 

‘सकाळ’ ऊर्जा आणि रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन कार्यक्रम औरंगाबादेत रविवारी (ता. २५) घेण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा म्हटले, की त्याचा अभ्यास आणि व्याप्ती कळायला हवी. या परीक्षांचा अभ्यास कसा करावा, नियोजनबद्ध अभ्यासातून कसे यश मिळवावे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध लेखक आणि वक्ते चेतन भगत हे औरंगाबादेत येत आहेत. रविवारी (ता. २५) दुपारी २.३० वाजता श्रीहरी पॅव्हेलियन, शहानूरमियाँ दर्गा चौक येथे हा कार्यक्रम होणार असून, तो सर्वांसाठी खुला राहणार 

आहे. या कार्यक्रमात रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राचे संस्थापक संचालक धनंजय आकात ‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

आयआटी ते आयपीएस
सैनिक स्कूल सातारा, राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज डेहराडूनचे विद्यार्थी सोमय मुंडे यांनी आयआयटी पवई येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. रिसर्च असोसिएट म्हणून काम करताना २०१६ मध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होत मसुरीतून फाउंडेशन कोर्स पूर्ण केला. फेज वन प्रशिक्षण हैदराबादेतून पूर्ण केल्यावर ते सध्या औरंगाबाद ग्रामीणला पुढील प्रशिक्षण घेत आहेत.

Web Title: marathi news Chetan Bhagat aurangabad news student UPSC MPSC