कर्जामुळे नांदेड जिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

नांदेड - सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 

येळंब (ता. हदगाव) येथील शेतकरी अनंता केशवराव आडकिणे (वय ३२) यांच्या शेतात तीन वर्षांपासून नापिकी होती. कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने ते विवंचनेत होते. त्यातून त्यांनी शुक्रवारी (ता. ९) रात्री नऊच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. हदगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.

मुदखेड येथील शेतकरी अशोक नागनाथ कंधारकर (६०) यांनी शनिवारी (ता. १०) पहाटे चारच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी त्यांनी रात्रभर शेतात गहू, हरभऱ्याचे खळे तयार केले. शेताला पाणी देण्यासाठी पुतण्याला वीजपंप सुरू करायला सांगून ते आपल्या शेताच्या पलीकडे गेले. तेथे त्यांनी झाडाला दोर बांधून गळफास घेतला. मुदखेडचे पोलिस उपनिरीक्षक मुंडे, सहायक निरीक्षक राठोड यांनी पंचनामा केला. कंधारकर यांच्यावर बॅंकांचे कर्ज होते. त्यातच शेतात कमी उत्पन्न व खर्च जास्त झाला होता. त्यामुळे ते विवंचनेत होते, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. 

Web Title: marathi news farmer suicide nanded