जेष्ठ उद्योगपती ब्रिजलाल खूराणा यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

जेष्ठ उद्योगपती ब्रिजलाल खुराणा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

हिंगोली : येथील जेष्ठ उद्योगपती ब्रिजलाल टेहलाराम खूराणा (वय 82) यांचे सोमवारी (ता. 12) रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. खूराणा ट्रॅव्हलचे ते संचालक होते. विविध शैक्षणिक संस्था त्यांनी हिंगोलीत स्थापन केल्या. स्व. नानाजी देशमुख स्मृती प्रतिष्ठान ते पदाधिकारी होते. भाजपचे ते केंद्रीय सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, एक मुलगी व पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर हिंगोली येथे बुधवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होतील.

Web Title: marathi news hingoli marathwada businessman brijlal khurana

टॅग्स