गारपिटीच्या नुकसानीचे ड्रोन कॅमेरा, सॅटेलाईटने पंचनामे करा - अशोक चव्हाण 

उमेश वाघमारे
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

जालना - गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे ड्रोन कॅमेरा, सॅटेलाईटने पंचनामे करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. गुरुवारी (ता.15) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह अन्य काँग्रेसच्या नेत्यांनी जालना तालुक्यात वंजारउमर्द येथे गारपिटीच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी काँग्रेसच्या वतीने मृत्युमुखी पडलेल्या नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री. चव्हाण म्हणाले, की गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनामे करण्यास उशिर होत असून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य निघून जातंय. त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे ड्रोन कॅमेऱ्याने किंवा सॅटेलाईटने तत्काळ पंचनामे करा. तसेच सरकारने हेक्टरी जाहीर केलेली रक्कम ही अल्प असून हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे अशीही मागणीही श्री. चव्हाण यांनी केली आहे.

Web Title: marathi news jalna hailstrom loss agriculture ashok chavhan