जालना: युवकाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या  माहितीनुसार  सोमवारी (ता.आठ)  पहाटे दोनच्या सुमारास एका युवकाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेल्याने आणि त्या ठिकाणी सातडलेल्या दोन मोबाईल, आधार कार्ड, पँनकार्ड या कागडपत्रामुळे मृतदेहाची ओळख पटली असून अनंत श्रीकांत इंगोले ( रा.समनापुर ता.जि.बीड वय 25 ते 30) असे आहे.

शहागड (जि. जालना) : जालना जिल्ह्यातील शहागड (ता. अंबड) शिवारातील शहागड-गोंदी रोडवरील कुराण फाट्यावर एका युवकाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. आठ) पहाटे उघडकीस आली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच  पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या  माहितीनुसार  सोमवारी (ता.आठ)  पहाटे दोनच्या सुमारास एका युवकाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेल्याने आणि त्या ठिकाणी सातडलेल्या दोन मोबाईल, आधार कार्ड, पँनकार्ड या कागडपत्रामुळे मृतदेहाची ओळख पटली असून अनंत श्रीकांत इंगोले ( रा.समनापुर ता.जि.बीड वय 25 ते 30) असे आहे. दरम्यान घटनास्थळी अर्धवट जळीत अवस्थेत काही रुपये व कागदपत्र आढळून आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच उपविभागिय पोलिस अधिकारी आर. व्ही. सोनुने, शहागड पोलिस चौकिचे पीएसआय विकास कोकाटे यांच्या टीमने व  गोंदी पोलिस ठाण्याचे पीएसआय मच्छिंद्र सुरवसे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेचा पंचनामा करुन मृतदेह  शहागड येथील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

Web Title: Marathi news Jalna news youth murder in Jalna